Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा

पीडित कुटुंबीयांनी केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रपूर शहरातील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी सायन्सला शिकत असलेल्या कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जैतापूर येतील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने कॉलेज परिसरात राहत असलेल्या रूम मध्ये गळफास लावून ११ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी अंदाजे नऊ ते दहा दरम्यान आत्महत्या केली. मुलीच्या मामांना कळताच आरडा ओरडा केला व रूम शेजारील लोक जमा झाली नंतर दर्गापूर पोलीस स्टेशन येते जाऊन तोंडी रिपोर्ट दिली.

त्यानंतर मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचे पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याकडे तपास केला पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधत असता, कारवाई कारण सांगत तपासात खूप दिरंगाई करत एक महिना लोटून गेला परंतु त्यांनी कुठलाच प्राथमिक तपास केलेला नाही त्यामुळे ठाकरे यांच्या तपासावर पीडित कुटुंबांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबांनी ठाणेदार मॅडम यांची भेट घेत झालेल्या प्रकरणाची काय चौकशी झाली अशी विचारणा केली असता पी एस आय ठाकरे यांची बदली झाली आहे असे सांगत पी एस आय मोहतुरे यांची तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली असे संगितले.

ठाणेदार मॅडम व पी एस आय मोहतूरे यांनी प्रकरण हाताळून पीडित कुटुंबाचे स्टेटमेंट नोंदवित पीडित कुटुंबांनी जैतापूर येतील आशिष नथु निब्रड ह्या तीस वर्षीय युवकावर संशय व्यक्त केला आहे. झालेल्या स्टेटमेंट वरून अधिकाऱ्याने समोरील चौकशीला गती दिली. परंतु मुलीकडे असलेला मोबाईल व संशयित असलेल्या आशिष निब्रड यांचा मोबाईल अधिकाऱ्याने जप्त करून तपासणीला पाठविला असे सांगितले असून मोबाईल चौकशीतून काय सत्य बाहेर येणार याकडे पीडित कुटुंबाचे व गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये