Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मनोहर चेके यांनी मुलाचा विवाह पारंपारिक पद्धतीने लावून समाजासमोर आदर्श ठेवला – आमदार मनोज कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तहसिल कार्यालयातील कर्मचारी मनोहर भिकाजी चेकें यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या पारंपारिक पद्धतीने वारकऱ्यांचा उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजरात लावून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे,आज समाजाने या परंपरेचे अनुकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी याप्रसंगी केले.

दारू व डी जे विरहित पार पडलेल्या या विवाह सोहळा मध्ये वारकऱ्यांनी आकर्षक वेशभूषेत सादर केलेले भजन, फुगडी नृत्य,लक्षवेधक होते,

या प्रसंगी नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ऍड नाजिर काझी, उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे, तहसिलदार अजित दिवटे,नायब तहसिलदार डॉ. वराडे, संजय सोनुने,मंडळ अधिकारी, तलाठी, अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, भजनी मंडळी, इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या विवाह सोहळा चे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये