अखेर कोरपना- भोयगाव-चंद्रपूर बससेवा पूर्ववत सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना -चंद्रपूर बससेवा नारंडा -भोयगाव मार्गे पूर्ववत तब्बल तीन वर्षानंतर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांची कमी अंतरात जाण्या येण्याची मोठी अडचण दूर झाली आहे.
सदर बससेवा सुरू झाल्यामुळे कोरपना, धोपटाळा, कुसळ, माथा,वनसडी,लोणी,नारंडा, शिव नारंडा, वनोजा, कढोली खुर्द,अंतरगाव, सांगोडा,हिरापूर, विरुर,गाडेगाव, बोरगाव, इरई,भोयगाव,भारोसा, धानोरा, पिंपरी , वेंडली, मारडा, देवाडा, दाताला, चंद्रपूर आदी गावच्या नागरिकाना चांगली सोय निर्माण झाली आहे. ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही बस सेवा सुरू झाली आहे. चंद्रपूर वरून नारंडा मार्गे कोरपनासाठी सकाळी ८.३० वाजता व सायंकाळी ५.३० वाजता व कोरपनावरून नारंडा मार्गे सकाळी १०.३० वाजता ही बस असणार आहे. तालुक्यातील नारंडा गावात प्रथम आगमन निमित्त बसचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष ताजने, वनोजा येथील सरपंच दिलीप पाचभाई,नारंडा उपसरपंच बाळा पावडे, कढोली खुर्द उपसरपंच विनोद डोहे,उत्तम मोहितकर,प्रवीण हेपट,संतोष वांढरे,अनिल चांदेकर,पप्पू पंदिलवार,मंगल खाडे,विनोद पेटकर, प्रमोद शेंडे,आशिष ढुमणे हर्षल चामाटे, रोशन पोटदुखे,भिकाजी घुगुल,गणेश पावडे,निखिल ताजने,मंगल निकोडे, सचिन काकडे,सचिन उरकुडे,मीन्नाथ लांडगे,सुरेश मुद्दलवार यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांनी वाहक व चालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अठरा किलोमीटरची बचत कोरपना येथून राजुरा मार्गे चंद्रपूरच्या अंतर सत्तर किलोमीटर हून अधिक आहे. भोयगाव मार्गे हेच अंतर पन्नास ते बावन किलोमीटर आहे. त्यामुळे कमी वेळेत जाणे येणे सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यातील गावांना तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या प्रवासासाठी ही बस सेवा उपयुक्त ठरणारी आहे.