ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे काँगेस पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ऑपरेशन सिंदुर मधील शुर विर जवानांना अभिवादन करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या स्मृति दिनी 21 मे रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा चे आयोजन देऊळगाव राजा येथे कऱण्यात आले आहे.

 तिरंगा यात्रा बस स्थानक चौकातून निघून अमर जवान चौक येथे विसर्जित होईल. तिरंगा यात्रा मध्ये काँगेस पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँगेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये