Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राणी दुर्गावती शास.औ.प्र. संस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर मार्गदर्शन 

एआय चे योग्य ज्ञानार्जन करून आपल्या व्यवसाय कौशल्यात प्रगती करावी - प्राचार्य खोब्रागडे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोबरागडे अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमकेसिएल चे डिस्ट्रिक्ट कोआर्डीनेटर लक्ष्मिकांत कांबळे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सचिन शंभरकर लाभले होते.

      अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थिनींनी हे ज्ञानार्जन करून आपल्या व्यवसाय कौशल्यात प्रगती करावी, असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी केले. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्व, उपयोगीता, त्यासंबंधी शासनाच्या विविध योजना यासंबंधीची सविस्तर माहिती यावेळी श्री.‌कांबळे यांनी दिली.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी गटनिदेशक अमित काळे यांनी केले तर शुभम साखरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये