Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीतील रोटरीचा उत्सव मेळ्याला स्थगिती

मेळ्याची नवी तारीख लवकरच : पत्रकार परिषदेतील माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      रोटरी क्लब तर्फे शहरातील तालुका क्रीडा संकुलनात रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन दिनांक 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सदर उत्सव मेळा काही कालावधी करता स्थगित करण्यात आला असून या उत्सव मेळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती रोटरी क्लब, भद्रावती तर्फे घेण्यात आलेल्या एका पत्रपरिषदेतून देण्यात आली आहे.

सदर मेळ्यासाठी नृत्य स्पर्धा तथा इतर स्पर्धेसाठी जे ऑडिशन घेण्यात आले होते हे पुढेही कायम राहणार असल्याची माहितीही पत्र परिषदेतून देण्यात आली आहे. सदर पत्र परिषदेला रोटरी चे अध्यक्ष किशोर खंडाळकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनील पोटदुखे, प्रा. डा. ज्ञानेश हटवार आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये