ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट

  आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे सन २०२५-२६ मधील पहिल्या बॅचचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा कौशल्य विकास व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी सन्मानचिन्ह योजनादर्शिका व माहिती पुस्तिका देऊन उपजिल्हाधिकारी पवार यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. पवार म्हणाले, उमेदवारांनी अभ्यासाची तीव्र इच्छा, निश्चीत ध्येय, प्रयत्नात सातत्य, कठीण परिश्रम, परिस्थितीची जाणीव ठेवून वाटचाल करावी. तसेच आपले ध्येय साध्य करावे. प्रास्ताविकात श्रीमती वाघमारे यांनी कार्यालयाची माहिती, प्रशिक्षणाचा उद्देश तथा स्पर्धा परिक्षाबाबतचे महत्व याबाबत माहिती दिली

           कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी नवीन बॅचच्या उमेदवारांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये