Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देशी विदेशी दारूचा माल अवैधरित्या विक्री

दारूबंदी कायद्यानव्ये प्रो.रेड कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 15/12/2024 रोजी पोस्टेला हजर असताना नांदगाव हिंगणघाट येथे राहणारा सुभाष मानंगरुडकर याचे राहते घरी कोमल गिरसावले हा देशी विदेशी दारूचा माल अवैध रित्या बाळगून विक्री करत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा.ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने गुन्हे प्रकटिकरण पथक व पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे दारूबंदी कायद्यानव्ये प्रो.रेड कार्यवाही केली असता आरोपी 1)सुभाष बाळकृष्ण मंगरुडकर वय 45 वर्ष व आरोपी 2) कोमल नामदेवराव गिरसावळे वय 25 वर्ष दोन्ही रा. नांदगाव (बोरगाव) हिंगणघाट याचे घरझडतीमधे 1)रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे बॉक्स मधे 48 बॉटल्स कीं 16,800/- रू. 2) ओसी ब्लू कंपनीच्या विदेशी दारुच्या 35 बॉटल्स कि.12,250 रू. 3) रॉयल ग्रीन कंपनीचे विदेशी दारुच्या 08 बॉटल्स कि.2,800रू 4) टुबर्ग कंपनीच्या विदेशी 08 बीअर कॅन कि. 2,400 रू. 5) देशी दारुच्या प्रीमियम कंपनीच्या 100 बॉटल्स कि. 10,000रू. 6) 02 लोखंडी पेट्या कि. 1,000रू. असा एकूण जु. कीं.45,250 रू चा दारू माल पचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपीतान विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला..ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे,चंद्रशेखर वाढवे पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे, शिव यादव, राहुल दूधकोहळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये