Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शहरातील प्रमुख मार्ग व इतर भागातील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी...?

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपूर) : शहरातील प्रमुख रस्ते, पोलीस ठाणे, शासकीय रुग्णालय, शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे खड्ड्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर रोज अपघात होत असून त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

 या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासकीय निष्काळजीपणा तर दिसून येतोच शिवाय जनतेप्रती जबाबदारीचा अभावही दिसून येतो. ही परिस्थिती विशेषत: रुग्णवाहिका आणि पोलिस वाहनांसारख्या आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेत अडथळा आणते.

 जनतेच्या मागण्या:

 1. संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित बुजवून रस्ते समतल व सुरक्षित करावेत.

 2. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे अशा जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 3. भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी, नियमित देखरेख आणि रस्त्यांची दुरुस्ती सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

  या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, ही गंभीर समस्या प्राधान्याने सोडवावी, अशी मागणीही नागरिकांमध्ये होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये