देऊळगाव राजा शहरा बाहेरील वळण रस्त्यावरील जाफराबाद चौफुली बनत आहे मृत्यूचा सापळा…
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरात वाहतुकीस अडथळे होऊ नये यासाठी शहरा बाहेरून वळण रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. रस्त्यावरील जाफराबाद चौफुली येथे कसल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक. तसेच गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी छोटे मोठे अपघात होत असतात अशाच प्रकारे दिनांक 11 डिसेंबर रोजी रात्रीला साडेअकरा वाजता कार चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून त्यात एक महिला ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त असे की शहराबाहेरील वळण रस्त्यावर असलेल्या जाफराबाद चौफुली येथे यापूर्वी बरेचसे अपघात झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी शहरवासीय करीत असताना त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले जात आहे.
दिनांक 11 च्या रात्री बुलढाणा येथील कुटुंब कार क्रमांक एम एच 28 ए झेड 0884 ने जालना येथून बुलढाणा कडे जात असताना शहरा बाहेरील जाफराबाद चौफुलीवर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीमध्ये असलेली महिला मृतक मीना तुळशीराम हिवाळे वय 45 वर्षे राहणार घाडगे नगर बुलढाणा यांना अपघातानंतर अत्यावस्त अवस्थेमध्ये ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अपघातामध्ये संजय चौधरी, रुद्र संजय चौधरी.तसेच मनीषा चौधरी ह्या जखमी झाल्या असून जखमीवर ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले ग्रामीण रुग्णालयाचे कक्ष सेवक संदीप वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहे.