क्राईम न्युजगुन्हेमहाराष्ट्र

प्रेमप्रकरणाच्या वादात युवकांची हत्या

दोन आरोपीना अटक

चांदा ब्लास्ट :

पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील छोटा नागपूर रोडवरील झुडपात अज्ञात इसमाचा मृतदेह राखळ टाकून झाकलेल्या अवस्थेत आढळून आला असता स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 8 तासात मृतकाची ओळख पटवून दोन आरोपींना अटक केली आहे.

आज दि. 18/05/2023 रोजी छोटा नागपुर रोड, पाईप लाईन जवळ, पटेल विटाभटटीच्या मागील बाजूस पाईपलाईनकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला झुडपामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडुन आहे व त्या मृतदेहावर राखळ टाकुन असल्याची माहिती पोलीस स्टेशन पडोली ला प्राप्त झाली त्यावरून पडोली पोलीस स्टेशन येथे कलम 302 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी सदर गुन्हयाचा छळा लावण्याकरीता वेगवेगळे पथक तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत मार्गदर्शक सुचना देवुन घटनास्थळावर रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरूवात करून गोपनीय माहिती काढुन अनोळखी मयत ईसमाची ओळख पटविली असता मयत इसम हा विशाल उर्फ विश्वास अमर पाटील, घुटकाळा वार्ड, चंद्रपुर येथील असल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपुर्ण तपास करून नमुद गुन्हयातील दोन आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, मृतक व दोन आरोपी हे शुक्रवारचे रात्री च्या दरम्यान पडोली येथे गेले असता, सदर ठिकाणी त्यांचेमध्ये वाद निर्माण होवुन भांडण झाल्याने आरोपीने मृतकाला मारहान करून खुन केला व मृतकाच्या शरीरावर जवळ असलेली राखळ टाकुन निघुन गेल्याची कबुली दिली.

सदर युवकाची हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाले असल्याची आणि मृतक आणि दोघे मारेकरी आरोपी ही अल्पवयीन असल्याचीमाहिती प्राप्त झाली आहे.

सदर कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंदपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक मडावी, पोउपनी विनोद भुरले, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पो.शि. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये