Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नित्यानंद आश्रम कोलांडी येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था कोलांडी येथे मार्गशीष महिन्याच्या शुभ पर्वावर गडचांदूर मधील प्रतिष्ठित व्यापारी वर्गातील भक्तगणासाठी एक स्नेह संमेलन कार्यक्रम 6 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गडचांदूर व्यापारी वर्गातील आणि कोलांडी नंदप्पा परिसरातील शंभर ते सव्वाशे भक्तगणाने संस्थेच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शविली , व्यापारी असोसिएशन गडचांदूर चे अध्यक्ष श्री हंसू भैय्या चौधरी ,होमिओपॅथिक डॉक्टर किसनराव भोयर ,श्री संजू मेंढी , श्री शिवाजी शेलोकर, श्री धनंजय छाजेड ,श्री बापूजी पिंपळकर,सौ किशोरीताई गोखरे, श्री रमेशचंद्र भालेराव , सौ रश्मी भालेराव ,श्री गेडाम साहेब आणि श्री सतीश उपलांचीवार, श्री गिरीश बोंगीरवार, डॉ लोनगाडगे , श्री प्रशांत पोतनूरवार, श्री सुनील झाडे ,श्री पानपटे साहेब आणि इतरही मान्यवरांनी आश्रमातील अध्यात्मिक सेवेबद्दल आणि सामाजिक सेवेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि भविष्यात या स्थानावर ज्या आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा करायची आहे त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्याची भावना प्रगट केली संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर देवाळकर यांनी आश्रमात आणि गोपालन सेवा झालेल्या कार्याची माहिती दिली आणि भविष्यात जे कार्य करायचे आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा दर्शवली त्यासोबतच मोती खान मामू या भक्ताचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला आणि महाप्रसादासोबत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली स्नेह मिलनाच्या कार्यक्रमासाठी श्री ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम संस्थेचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते आणि श्री धनंजय भाऊ छाजेड श्री महादेव हेपट श्री प्रशांत भाऊ गोखरे यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये