Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे श्री साईबाबा स्थापना दिन उत्सव

भव्य शोभायात्रा, घटस्थापना, भजन, किर्तन रांगोळी स्पर्धा, मार्गदर्शन, नाटिका व महाप्रसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         स्थानिक बगडेवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात दि. १८ , १९ व २० डिसेंबर रोजी श्री साईबाबा स्थापना दिन उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त भव्य शोभायात्रा, घटस्थापना, भजन, किर्तन रांगोळी स्पर्धा, मार्गदर्शन, एकांकिका व महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे.

दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. साईबाबा मूर्ती पूजन, घटस्थापना व आरती, ८.३० ते ११वा. स्वच्छता अभियान दुपारी १२ ते ४.३० वा. रांगोळी स्पर्धा ,सायंकाळी ५ ते ६ वा. महिलांसाठी विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम. याप्रसंगी माजी महिला समुपदेशक व बाल सहाय्यक कक्ष, समिती सदस्य योगिता लांडगे महिलांना मार्गदर्शन करतील. ६ वा. साईबाबा ची आरती, ७ वा. शालीक दानव लिखीत व दिग्दर्शित “ सुखकर्ता तूच दुखहर्ता ” ही एकांकिका सादर करण्यात येतील. संगीत साथ प्रकाश पिंपळकर यांची असेल.

     दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. श्री साईबाबा मूर्ती पूजन व आरती, ११ ते ३ वा. ह .भ. प. केशवानंद मेश्राम महाराज व समस्त महिला व पुरुष सत्संग मंडळ ज्ञानेश्वरी हरिपाठ सादर करतील. सायंकाळी ५ वा. श्री साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रा काढण्यात येईल. कलशधारी महिला भगिनी, भजन दिंडी, श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध दृश्य ,संतोषी बँड पथक आणि दुर्गा वाहिनी आदि शोभा यात्रेचे विशेष आकर्षण असेल. ही शोभायात्रा श्री साईबाबा मंदिर बगडेवाडी इथून जुने वडाचे झाड, विठ्ठल मंदिर, किल्ला वार्ड, वाल्मीक चौक, जंगल नाका, परत जुना बसस्टॉप महात्मा गांधी चौक मार्गाने परत प्रारंभ स्थळी येईल.

    या शोभायात्रेत खा. प्रतिभा धानोरकर, केंद्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, आ. करण देवतळे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुंडावार, जेष्ठ नागरिक विलास गुंडावार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,रॉ.कॉ. चे मुनाज शेख, तहसीलदार राजेश भांडारकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी आणि पोलीस निरीक्षक अमोल् काचोरे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. रात्रो १० वा. ओमसाई भजन मंडळ किल्ला वार्ड भजन संध्या सादर करतील.

  शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. ह.भ.प. भुजंग खानोरकर महाराज यांच्या शुभहस्ते श्री साईबाबा मुर्तीचा अभिषेक , १० वा. आदर्श भजन मंडळ युवराज बोरकर व संच भजन संध्या सादर करतील. दुपारी १२ वा. गुरुकुंज आश्रम मोझरी येथील ह.भ.प. प्रकाश वाघ महाराज व संच गोपाल काल्याचे किर्तन सादर करतील. याप्रसंगी वरोरा येथील जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी ३ वा. अहवाल वाचन , श्रध्दांजली व आभारप्रदर्शन आणि सायंकाळी ४ वा. महाप्रसाद वितरीत करण्यात येईल. या उत्सवात जनतेची फार मोठया संख्येत सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये