ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाद्वारे जप्त

वन विभागाच्या पिरली नियत क्षेत्रातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           वनपरिक्षेत्रामध्ये रेतीचे अवैध उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई भद्रावती वनविभागाद्वारे वन विभागाच्या पिरली नियत क्षेत्रात दि. 11 मार्च 2025 ला सकाळी 7.30 वाजता करण्यात आली. वन कर्मचाऱ्यांची पिरली भागात गस्त सुरू असताना पिरली नियत क्षेत्राततील नाल्यातून एम एच 34 एपी 22 90 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर द्वारे अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून तिची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. या वाहतुकीचा परवाना आढळून न आल्याने ट्रॅक्टर मालक तथा चालक रुपेश संभाजी जांभुळे राहणार पावणा यांच्यावर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.

सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक ए बी शेळके, वनरक्षक एमआर देठे, अमरदीप कोल्हे, नामदेव जीवतोडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये