Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जागतिक एड्स दिनानिमित्य शहरातून जनजागृती रॅली

उत्कर्ष जनकल्याण संस्थेचा सहभाग 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 03 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, सामान्य रुग्णालय वर्धा व उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन सामान्य रुग्णालय वर्धा येथे एचआयव्ही/ एड्सबद्दल जनजागृती व्हावी याकरीता महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची एड्स संदेश रॅली दिनांक 03 डिसेंबर ला सकाळी ठीक 09.00 वाजता मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते रॅलिला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली या वेळी संस्थे चे अध्यक्ष डॉ अभ्युदय मेघे विधी सेवा प्राधिकरणाचं विवेक देशमुख प्रवीण हिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“Take the Rights Path” “मार्ग हक्काचा, सन्मानाचा” हे रॅलीचे घोषवाक्य असून रॅलिची सुरवात सामान्य रुग्णालय वर्धा येथून निघुन बस स्टॉप ते बजाज चौक ते सौशालिस्ट चौक ते जिल्हा परीषद सभागृह असा मार्ग होता. या रॅलीच्या समाप्ती नंतर उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था वर्धा चे प्रकल्प संचालक मा.श्री. अभ्यूदयजी मेघे सर यांच्या कडून रॅलिमध्ये उपस्थित सर्वांना अल्पोहार वाटप करण्यात आला.

या समारोप कर्यक्रमात एडस प्रतिबंधन साठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार मा जतीन रेहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वर्धा यांनी केला . या वेळी उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्थेला उत्कृष्ठ कार्यबदल प्रमाण पात्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित श्री. देशमुख सर सचिव विधिसेवा प्राधिकरण, डॉ. सुमंत बाघ सर जिल्हा शल्य चिकित्सक, श्री. राज पराडकर जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिवरे सर व सुचिता बोभाटे मॅडम तसेच टीम, DSRC चे नितीन साखरे सर, ART विभागाचे डॉ. धूल सर, विहान संस्था, महाराष्ट्र नर्सिंग स्कूल, आंबेडकर कॉलेज, कुंभलकर कॉलेज, राधास्वामी नर्सिंग स्कूल व शहरातील विविध शैक्षणिक संस्थांनी या एड्स संदेश रॅलिमध्ये सहभाग घेतला.संस्थे तर्फे या कार्यक्रम हर्षल पिसुडे वृषाली उगले मोनाली वंजारी सपना शिरपूरकर मोहित सहारे तारा ब्राम्हणकर वंदना जबडे गौरी वाघमारे ज्योती सुर्वे दीपा यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये