Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        श्री दत्त जयंती निमित्ताने शहरातील गणेशदत्त गुरु पंचायतन मंदिरात दिनांक 07 डिसेंबर ते 13 डिसेंबर यादरम्यान श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरात भजन संध्या, सामूहिक मंत्रजाप, भजन संगीत, प्रवचन, दीप यज्ञ तथा संगीत महोत्सव, कीर्तन, श्रीमद्भागवत गीता पठण, रांगोळी स्पर्धा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 14 ला श्री दत्तयाग, श्री दत्त जन्म सोहळा श्री दत्त जन्म किर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दिनांक 14 रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रांगणातून एका भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवटी गोपालकाला कीर्तन तथा महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. शहर तथा परिसरातील भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये