चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जागतिक दिव्यांग दिन शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे साजरा करण्यात आला, दिव्यांग दिनानिमित्त देऊळगाव राजा च्या नायब तहसीलदार सायली जाधव तसेच पंचायत समिती कार्यालय येथील इंदिरा वाकुर्डे उपस्थित होत्या.
त्यांनी दिव्यांगाच्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्या मार्फत जाणून घेऊन,दिव्यांगांना शासकीय योजनेची कसली अडचण आल्यास आम्हाला तुम्ही लेखी स्वरुपात कळवा आम्ही तुम्हाला मदत करू,पंचायत समितीच्या वतीने सांगितले की आमच्या विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजना तुमच्यापर्यंत लाभ पोहोचून देऊ असे सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग बंधू तालुका अध्यक्ष संदीप मस्के तालुका सचिव संतोष कराळे तसेच दीपक वायाळ, अंबादास बुरकुल, बालू शिंगणे, राहूल कांबळे, संदीप जाधव, गुलाब सुरुशे, निर्जला मांटे, भगवान वायाळ, आदी दीव्यांग बांधव उपस्थित होते.