Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सुरज दहागावकर यांना शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप जाहीर

मुंबई येथे ८ डिसेंबर होणार फेलोशिप प्रदान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर: यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने दिली जाणारी प्रतिष्ठित ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ चंद्रपूर येथील युवा लेखक, कवी सुरज दहागावकर यांना जाहीर झाली आहे. या फेलोशिपचे स्वरूप रुपये एक लाख असून, येत्या ८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे त्यांना फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

१२ डिसेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या या फेलोशिप अंतर्गत साहित्य, कृषी आणि शिक्षण या क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्वांना भविष्याच्या नेतृत्वासाठी प्रेरित करण्याचा उद्देश आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ही फेलोशिप दिली जाते, आणि यासाठी राज्यभरातून ऑनलाइन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये २०२५ या वर्षासाठी सुरज दहागावकर यांची निवड करण्यात आली आहे.

सुरज दहागावकर हे समाजकार्याचे शिक्षण घेतलेले आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. सध्या गोंडवाना विद्यापीठात जनसंवाद विषयाचे शिक्षण घेत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून विचारज्योत फाऊंडेशनच्या माध्यमातून मानसिक आरोग्यावरील जागरूकता निर्माण करत आहेत. याशिवाय, ते इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांनी विविध सामाजिक आणि मानसिक प्रश्नांवर १०० हून अधिक लेख प्रकाशित केले आहेत.

सुरज दहागावकर यांची शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी निवड ही त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी एक मोठे पाऊल आहे. यामुळे त्यांना अधिक संसाधने, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे लेखन कार्य आणखी प्रभावी होईल. ही फेलोशिप सुरज यांच्या कार्याला एक नवा आयाम देईल.

सुरज दहागावकर यांना शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये