चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : भारतीय राज्य घटना स्वीकारून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी (२६ नोव्हेंबर,२०२४) ला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा कोरपना तालुका विधी सेवा समितीच्या वतीने स्कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज कोरपना येथे आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी संविधान दिवस या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाची जनजागृती तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आज घरा घरात संविधानाचे उपासक तयार होण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले.
समता आणि बंधुता ही मूल्ये संविधानाचा पाया आहेत.समानतेचा अर्थ केवळ जातीशी संबंधित नाही.ती प्रत्येकाच्या व्यवहारात असली पाहिजे, असे सांगत यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील त्यांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्य समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना संविधान संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची यावेळी प्रतिज्ञा देण्यात आली
यानंतर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश मा.ए. जे.पाटील साहेब यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ संबंधी विशेष कायदेशीर जागरूकता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मा.ए.जे.पाटील ( अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, क स्तर तथा न्या. प्र. श्रेणी कोरपना), सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना, कल्याण जोगदंड शिक्षण विस्तार अधिकारी गडचांदूर, श्री कामतवार केंद्रप्रमुख कोरपना, राहुल उलमाले (प्राचार्य) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली खडसे तर आभार प्रदर्शन करिश्मा साठोने या ज्युनिअर लेक्चरर ने केले.