स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
भद्रावती शहरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ट्रॅक्टर द्वारा अवैध रेतीची वाहतूक करून ती घर बांधणीच्या ठिकाणी खाली करीत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दिनांक 12 रोज बुधवार ला पहाटे 4.30 वाजता च्या सुमारास शहरातील टप्पा चौक परिसरात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना शहरातील टप्पा चौक परिसरात एम. एच. 29 बी पी 0418 या क्रमांकाचे ट्रॅक्टर रेती खाली करताना आढळून आले.
गुन्हे शाखा पथकाने विचारपूस केल्यानंतर सदर रेतीची अवैधरित्या वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार समीर बंडू चौधरी व भारत बोडेकर दोघेही राहणार मांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची पुढील कारवाई भद्रावती पोलीस करीत आहे