Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या वतीने चंदनखेडा येथे धान खरेदीला सुरूवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

           कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार, चंदनखेडा येथे मंगळवार दि. 26/11/2024 रोजी धान खरेदीला सुरूवात करण्यात आलेली आहे. बाजार समितीचे उपबाजार आवार, चंदनखेडा येथे शेतकऱ्यांच्या हिताचे दृष्टीने नव्याने उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वे-ब्रिज वर वजन माप करून योग्य दरात शेतमाल खरेदी करण्यात येत आहे. यास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे बाजार समितीत शेतमाल आवक वाढत आहे. उपबाजार आवार, चंदनखेडा येथे शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव, वे-ब्रिज द्वारे अचुक वजन करणे, पारदर्शक व्यवहार ठेवणे, शुद्ध पिण्याचे पाणी इ. सुविधा पुरविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव व कर्मचारी वृंद तसेच समस्त संचालक मंडळ तत्परतेने काम करीत आहे.

शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन

 चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शेतमाल सोयाबीन व धान खेडा खरेदी करणारे व्यापारी यांना न विकता भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार, चंदनखेडा येथे विक्रीस आणण्याचे करावे, असे संयुक्त आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ल. ताजणे, उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर (जिवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये