गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरातील रामसेतू पुलावर घडले भयानक हत्याकांड

डीजेच्या वादावरून एकाची हत्या ; ५ आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट

लग्नाच्या वरातीत डीजे वरून डीजे झालेल्या वादात एका मुलाला बेदम मारहाण करताना त्याचे वडील सोडवायला गेले असता मारेकऱ्यांनी लोखंडी वस्तूने त्याच्या वडिलावर वार केला यात वडीलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरातील रामसेतू उड्डाणपुलावर घडली. किशोर नत्थुजी पिंपळकर वय ४८ वर्ष, राहणार तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर वय १८ वर्ष, रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलाचे नाव आहे.
दि. १५ जून २०२३ रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताला मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजेच्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी          वरातीतील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केले याची माहिती ओमचे वडील किशोर पिंपळकर यांना मिळताच ते भांडण सोडवायला गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी वस्तूने जबर मारहाण केली यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला.
जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु, किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर हलविण्यात आले परंतु, मार्गातच त्यांचा मृत्यू झाला.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये