ताज्या घडामोडी

वर्धा जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थानांचे चिन्हांकण सुरू – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार ह्यांनी दिले आदेश

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

अविनाश नागदेवे

महाराष्ट्र राज्याचे रस्ते व परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील एकूण 35 अपघातप्रवण स्थान (ब्लॅक स्पाॅट) आहेत अशे घोषित करण्यात आले आहे यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत परिवहन विभागाचे आयुक्त श्री विवेक भिमनवार यांनी यावेळी परिवहन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पोलिस विभाग व नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.

यावेळी वर्धा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी समीर आयुब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कांरजा घाडगे येथे तपासणी करीता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश पाटील व यांच्या सोबत परिवहन अधिकारी विशाल भगत आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी विनीत घागे व नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ढगे, भांगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे  नासरे तपासणी करीता नेमणूक करण्यात आली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये