Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चांदा पब्लिक स्कूल घडवतेय सृजनशील व्यक्तिमत्व

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांदा पब्लिक स्कूल सदैव अग्रेसर असते. त्यांच्या सृजनशील व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केल्या जाते. परिणाम स्वरूप विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासासोबतच क्रिडा, कला याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी पुर्वप्राथमिक विभागापासुनच हा पाया रचला जातो.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी व केलेल्या पाठांतराचे प्रस्तुतीकरण मुलांना करता यावे हा उद्देश्य लक्षात घेता नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता पठण व यु.के.जी. च्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना निसर्गातील लपलेल्या सौंदर्यांची अनुभूती व्हावी यासाठी एल.के.जी. च्या विद्यार्थ्यांना विविध झाडांच्या पानांपासून कलाकृती सादर करण्याची नाविण्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित परिक्षक डॉ. आम्रपाली शिवराज देवगडे व श्रीमती वैशाली टोंगे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. चिमुकल्यांचा स्पर्धेत उत्साह व प्रस्तुतीकरण पाहुन परिक्षक भारावून गेले. तर शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करून शिक्षक व पालक यांची विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये भुमिका किती महत्त्वपुर्ण आहे व या विद्यार्थीस्वरूप गाडीचे शिक्षक व पालक हे दोन चाक असून या दोघांनाही विकासाची गाडी मिळून पुढे न्यायची आहे असे वक्तव्य केले. तर मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी मुलांचे प्रस्तुतीकरण व त्यांचे धाडस पाहुन त्यांचा उत्साह वाढवला.

ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मंजुश्री नवरखेले व श्वेता मच्छा यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका दुर्गावती यादव यांनी केले. परिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये