ताज्या घडामोडी

अम्माचा आर्शिवाद घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी बजाविला मतदानाचा अधिकार

नागरिकांना मोठ्या संख्येने लोकशाहिच्या उत्सवात सहभागी होण्याचे केले आवाहन

चांदा ब्लास्ट

       आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अम्माचा आर्शिवाद घेत सकाळी १० वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात सह परिवार मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत कल्याणी किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजना जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, कोमल जोरगेवार, यांची उपस्थिती होती.

       देशाच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नागरिकांनी बाहेर निघावे अशी विनंती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आजचा दिवस राज्याच्या भविष्यासाठी मोठा असून आज आपण मतांच्या ताकतीचा योग्य वापर करुन लोकतंत्र बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये