ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणूक संबंधाने अवैधरित्या गावठी मोहा दारूवर वॉश आऊट मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 14/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना सौं मीना सुनील भोसले तसेच रंजित भुजंग पवार दोन्ही राहणार खैराटी पारधी बेडा हे त्यांच्या बेड्या जवळील नाल्या जवळ अवैदयरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता दारूभाट्ट्या लाऊन मोहा दारू गाळीत आहे.

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा उमरी पारधीबेडा येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे पारधीबेडा येथे रेड केला असता पहिल्या कारवाईत सौं.मीना सुनील भोसले हिच्या ताब्यातून प्लास्टिक लोखंडी मोठया ड्रम मधे 1900 लिटर कचचा मोहा रसायन सडवा, 200लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 90 लिटर मोहा दारू, दारूभाट्टीचे साहित्य व दारुविकरीचे नगदी रोख असा एकूण जु. कीं. 1,97,150 रू चा मुद्देमाल मिळुन आला. तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये रंजीत भुजंग पवार व 25 वर्ष राहणार शिवनी पारधी वेडा मुक्काम खैराटी पारधी बेडा याच्या ताब्यातून प्लास्टिक व लोखंडी ड्रम मध्ये 2000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, 120 लिटर गावठी मोहा दारू, दारू भट्टीचे साहित्य, दारू विक्रीचे नगदी रोख असा एकूण जुमला किंमत 2,11,520 /- रू चा माल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत तरोडा पारधी बेडा येथे सौ शोभिता चरण भोसले व 39 वर्ष राहणार तरोडा पारधी वेडा हिच्या ताब्यातून 1000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, दारू भट्टी करता वापरलेला 200 लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 60 लिटर गावठी मोहा दारू, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम असा एकूण जुमला किंमत 1,06,800/- रुचा माल जप्त करण्यात आला. तिन्ही कारवाहीमध्ये एकूण जु. कीं. 5,15,470 /- रू चा मुद्देमाल पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून जप्त करून सदर कच्चा मोहन रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम, गावठी मोहा दारू नाश करून करून आरोपी1) मीना सुनील भोसले, 2)रंजीत भुजंग पवार दोन्ही रा खैराटी पारधीबेडा 3) सौ शोभिता चरण भोसले रा.तरोडा पारधीबेडा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये