ताज्या घडामोडी

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे,श्वेतालाना टिपले,मनोज तोडासे उपस्थित होते.

सर्वप्रथम पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.रूबी कैथल हिने मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी चिरमुलवार हिने केले तर आभार प्रदर्शन शबनम शेख हिने केले कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये