ताज्या घडामोडी

आसापुर येथे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून नेत्र तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सी.एस.आर. अंतर्गत सभोवतालील गांवात नेत्र तपासणी शिबीर घेत जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील आसापूर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आलेत.

यात आसापूर ग्रामपंचायत मधील लिंगनडोह,पेदासापूर,आसापूर व गढपंढरवानी अश्या ४ गांवचा समावेश आहेत.

या शिबिरात एकूण ४ गांवातील एकूण २३१ लोकांची नेत्र तपासणी करून त्यांना औषोधोपचार करण्यात आलात तर ज्यांना चष्म्याची गरज आहेत त्यांना चष्मा सुद्धा वाटप करण्यात आले.

या नेत्र तपासणीला चंद्रपूर येथील नेत्रतज्ञ डॉक्टर पराग टेम्बुर्डे व त्यांची टीम उपस्थित होती.

या नेत्र तपासणीबद्दल आसापूर ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश सोयाम व उपसरपंच लच्छु सोयाम यांनी अल्ट्राटेक ,माणिकगढ सिमेंट कंपनीला मनापासून धन्यवाद दिलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये