ताज्या घडामोडी

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बिरसा मुंडा व गुरुनानक जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा व शिख धर्मगुरु गुरुनानक साहेब यांची जयंती आज साजरी करण्यात आली.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे , प्रा. नंदा भोयर, प्रा. आरजू आगलावे उपस्थित होत्या सर्वप्रथम क्रांतीवीर बिरसा मुंडा व शिख धर्मगुरू गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी तोडासे प्रा झाडे मॅडम, प्रा.  ताजने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन वामन टेकाम यांनी केले.

   कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये