ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.सी.सी. कॅम्प सायबर जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 13.11.2024 रोजी एन.सी.सी कॅम्प 21 बटालियन, बी. डी. इंजिनियरींग कॉलेज सेवाग्राम, वर्धा येथिल अधिकारी व कॅडेड यांना सायबर गुन्हयांबाबत मार्गदर्शन करणे करिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन शिबीरामध्ये सायबर शाखेतील सपोनि श्री. सुमंतराज भुजबळ, पोशि अंकीत जिभे, मपोशि स्मिता महाजन, व टिम यांनी मोबाईल, फेसबुक, व्हॉटसअप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरिता व सायबर जगात स्वतःला सुरक्षित ठेवणे संबंधाने माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करून इतर लोकांना सुदधा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापुर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.

सदर कार्यक्रमास एन.सी.सी कॅम्प 21 बटालियन, वर्धा येथिल प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल थापा सर, एन.सी.सी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर सर इतर अधिकारी व एकुण 350 कॅडेट हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये