ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना महत्वाचे आवाहन

पोलीस दलातर्फे बेशीस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरात वाहनांची संख्या वाढल्याने मार्केट परीसरात मुख्य रस्त्यांवर, बॅचलर रोड, बसस्टॅण्ड येथे वाहन धारक त्यांचे वाहन नो पार्किंगचे ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करुन रोडवर वाहन उभे करतात. तरी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे अशा बेशीस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सुरु करण्यात आली आहे.

तरी यानंतर वर्धा शहरात नो पार्किंगचे ठिकाणी रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रोडवर वाहन उभे करील असे बेशिस्त वाहन टोईंग व्हॅनद्वारे उचलुन त्यावर मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये