लैंगिक अत्याचार करून खून : पोलिसांनी पुरावा नष्ट करून दाखवली आत्महत्या
मृतक अल्पवयीन मुलीच्या आईचा पत्रकार परिषदेत आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चोरा (रै) येथे दि. २० मे २०२५ ला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातील विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळला.पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र मृतक मुलीचे आईने आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचे वर ९ जणांनी लैंगिक अत्याचार करून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी सुद्धा पुरावा नष्ट केला. असा आरोप मुलीची आई दिपा आसुटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
या प्रकरणात अत्याचार प्रकरणी अमोल दोडके याला अटक केली. त्याचेवर पास्को सहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उर्वरित आठ आरोपिंना मोकळे सोडण्यात आले.या आठ आरोपींवर खुनाचा तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मुख्य आरोपीवर सुद्धा खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या आईने यावेळी केली.
मृतक ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. पोलिसांनी या प्रकरणात अजून पर्यंत कोणाचीही बयान नोंदवले नाही. गावात येऊन प्रत्यक्षरीत्या बयान घेतल्यास सत्य बाहेर येईल. शवविच्छेदन भद्रावतीला करण्याऐवजी चंद्रपूरला करण्यात आले. मृतदेह जमिनीत पुरवण्याऐवजी जाळण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या. या प्रकरणात आरोपीवर कारवाई करण्याऐवजी काही राजकीय नेत्याच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोप सुद्धा यावेळी केल्या गेले. आठ दिवसाच्या आत पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नाही तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करू असे पत्रपरिषद सांगण्यात आले. यावेळी दीपा आसुटकर, रंदिप आसुटकर विनोद खोब्रागडे उपस्थित होते.
लता वाढीवे – ठाणेदार भद्रावती
घटनास्थळी मुलीची चप्पल मोबाइल होता. त्यानंतर विहिरीकडे मृतक मुलगी जात असताना बघणारे तीन साक्षरदार आहे. मृतक मुलगी व इतर व्यक्तीशी मोबाईलद्वारे झालेले संभाषण तसेच चार डॉक्टरनी केलेल्या शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल यात आत्महत्या केल्याचे सिद्ध होते. ही हत्या नाही.