ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीतील महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मनोज देवानंद कायंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा येथे नारळ फोडून करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथून प्रचार रॅलीला शुभारंभ झाला शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत रॅली मंदिरात पोहचली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काढलेल्या प्रचार फेरी दरम्यान मनोज कायंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत केलेला सन्मान स्वीकारला. यावेळी लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षण याबद्दल आभार मानले.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून जनतेचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद ही नक्कीच विजयाची नांदी ठरेल. माझ्या हातून शेवटपर्यंत लोकहिताची कामे व्हावीत व त्यातून सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत, हीच सदिच्छा ग्रामस्थांकडून त्यांनी व्यक्त केली.

त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाझिर काझी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे, सतीश कायंदे,सिंदखेड राजा नगर परिषदेचे माझी नगराध्यक्ष विष्णु मेहेत्रे, देविदास ठाकरे, देऊळगाव राजा चे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश डोईफोडे,प्रा दिलिप सानप, हाजी सिद्दीकी सेठ, गजानन काकड, सुभाष दराडे,विनय लंगोटे, भानुदास कोल्हे, लक्ष्मण कवळे, विकास गवई, तथा इतर पुरुष व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये