ताज्या घडामोडी

आगामी विधासनभा निवडणुकी संबधाने पोलीस स्टेशन वर्धा शहर दारूबंदी पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनाक १४/११/२४ रोजी कंळब येथील बार मालक मुकेश जयस्वाल व त्याचा साथीदार हे कंळब ते वर्धा मार्गाने त्यांच्या ताब्यातील पांढया रंगाचे स्विप्ट विडीआय कंपनिचे क एम ३२ सि ५९८५ ने विदेशी व देशी दारूचा माल वाहतुक सांवगी मेघे कडुन वर्धाला घेवुन येत आहे अश्या मुखबीर यांच्या खात्रीशिर खबरे वरून बजाज चौक वर्धा येथे नाकेबंदी करून दुरूनच दोन इसम हे त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनिची स्विप्ट विडीआय क. एम. एच/३२/सि/५९८५ कार येताना दिसली दुरूनच त्याना हात दाखवुन थांबविण्याचा इशारा दिला असता त्यांनी वाहन थांबविले नाही, आम्ही पोस्टफ त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील वाहण हे त्यांनी हनुमान नगर, वर्धा येथे वाहण रोडच्या कडेला अंधारात उभे करून दोन्ही इसम पसार झाले. सदर घटनास्थळा वरून वाहणाच्या मागील शिटवर व डिक्कीमध्ये देशी- विदेशी दारूचा वेगगवेळ्या कंपनिचा माल किमत २६८,००० व एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनिची स्विप्ट विडीआय क. एम. एच/३२/सि/५९८५ कार अंदाजे कींमत २,६०,०००/- रू. असा एकुण जु. किंमत ५,२८,०००/- रुपयांचा माल बिना पास परवाना मिळुन आला. वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर अप क १९३३/२४ कलम ६५(अ) (ई),७७ (अ), ८३ म.दा.का. सह कलम ३ (१)/१८१, १३०/१७७. मो. वा. का प्रमाणे नोंद करून तपासात घेतला

सदरची कार्यवाही हि मा, पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर सा तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक पराग पोटे सा याचे निर्दशनानुसार सपोनि गायकवाड सा दारूबंदी पथकाचे प्रमुख पोहवा सुहास चांदोरे पोलीस शिपाई मनोज काकपुरे, पोलीस शिपाई जीवन आडे, पोलीस शिपाई नवनित वानखेडे यानी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये