ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन

ब्रिजभूषण पाझारे, राजू गायकवाड यांच्यावर कारवाई

चांदा ब्लास्ट

बंडखोरी करून भाजपा-महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट सूचना होत्या. मात्र, चंद्रपूर आणि वरोरा येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा आदेश ऐकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ब्रिजभूषण पाझारे, राजू गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना निलंबनाचे पत्र दिले आहे.

‘आपण विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये चंद्रपूर आणि वरोरा विधानसभा मतदासंघातील भाजपा- महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ही बंडखोरी पक्षाच्या विरोधात असल्याने आपणास पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे’, असे पत्र जिल्हाध्यक्षांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये