ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही पोलिस ठाण्यांतर्गत उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे होते सुरू

ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला दारूबंदीचा ठराव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले झाले आहे आले. दारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला.

तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व गावात तंटे होणार नाही याची काळजी घेण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले. विशेष ग्रामसभेला सरपंच नीता बोरकर, पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परमानंद बोरकर, ग्रामपंचायत सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मसराम, राजीव मसराम, माजी सरपंच सदाशिव बोरकर, अंगणवाडी शिक्षिका, युवक महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थित म्हणून नवरगाव बिटचे बीट अंमलदार तसेच पोलिस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये