ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तब्बल 9 महिन्यापासून गैरहजर असलेले शिक्षक मोहन खरात निलंबित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पंचायत समिती देऊळगाव राजा अंतर्गत येत असलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरखेड येथील सहाय्यक अध्यापक मोहन बळीराम खरात 13 जानेवारी 2024 पासून कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर असल्याने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी मोहन खरात यांना निलंबित केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरखेड येथील शिक्षक मोहन खरात 13 जानेवारी पासुन कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर असल्याने मुख्याध्यापक यांनी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांना कळविले,त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांनी संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली, मात्र शिक्षक खरात यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा कार्यालयास सादर केला नाही , किंवा संपर्क साधला नाही, त्या वरून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 चे नियम 3 चा भंग केल्याने शिस्तभंग कार्यवाहीस पात्र झाल्याने गट विकास अधिकारी मुकेश महोर यांनी शिक्षक मोहन खरात यांना 29 ऑक्टोंबर पासुन निलंबित केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये