ताज्या घडामोडी

राजुरा भाजपात असंतोषाची ठिणगी? – देवराव भोंगळेच्या उमेदवारीने प्रस्थापित नाराज

ॲड संजय धोटे, सुदर्शन निमकर ह्यांचेसह खुशाल बोंडे घेणार एकत्रित पत्रकार परिषद - राजुरा भाजपात होणार का बंडखोरी?

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच विविध पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहिर करणे सुरू केले असुन जवळपास सर्वच पक्षात असंतुष्टता असल्याचे स्पष्ट होत असुन पार्टी विथ डिफरन्स, शिस्तबध्द पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भाजापात देखिल पक्षनेतृत्वाला डोळे दाखवणे सुरू असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत देवराव भोंगळे ह्यांची उमेदवारी जाहीर करताच इतर इच्छुक नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले असुन राजुरा क्षेत्राचे भाजपाच्या इतिहासातील कमळ चिन्हावर निवडून आलेले एकमेव आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर तसेच जुने निष्ठावान नेते खुशाल बोंडे नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले असुन हे तीनही नेते रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:00 वाजता राजुरा एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडणार आहेत.

पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन उमेदवार निवडीबाबत आपला विरोध व रोष व्यक्त करण्याची भुमिका घेतली असल्याची शक्यता असुन हे तीनही नेते नेतृत्वाला आपली भुमिका कळविणार असल्याचे बोलल्या जात असुन हे नेते प्रसंगी बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार काय? ह्याकडे मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये