एम.डी (मॅफेड्रॉन) विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या गळाला.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 15/05/2025 रोजी “सिंदी मेघे वर्षा येथे राहणारा यश पराते हा दर्पण बंडे व आपले दोन साथीदारासह व्हाईट रंगाच्या एस कॉस कार क्र. एम.एच. 32 ए.एच 8601 या चारचाकी वाहनाने दर्पण बंडे याचे वाहनाने नागपुर येथे एमडी पावडर घेण्याकरीता काल रात्री नागपुर येथे गेले होते. ते आज दिनांक 15/05/2025 रोजी सकाळचे सुमारास सिंदी मेघे, वर्धा येथील मटन मार्केट चौक, वर्धा येथे येणार आहे. तसेच सदर वाहनात यश पराते, दर्पण बंडे, विशाल बादलमवार व अंकुश तिरपुडे असे 4 जण आहे. त्यांचे गाडीत एमडी (मॅफेड्रॉन) असुन ते एम.डी. ची नशा करतात व वर्धा येथे विकी सुध्दा करतात. अशा माहीतीवरुन, सिंदी मेधे, वर्धा येथील मटन मार्केट चौकात पोलीस स्टाफ कडुन नमुद ठिकाणी सापळा रचुन आरोपी क्र. 1) यश निलेश पराते, वय 25 वर्ष, रा. न्यू रेल्वे कॉलनी सिंदी (मेघे) वर्षा, 2) अंकुश गजानन तिरपूडे, वय 25 वर्ष, रा. गणेश मंदीरजवळ हिंद नगर वर्धा, 3) दर्पण अशोक बंडे, वय 29 वर्षे, रा. वार्ड नं. 3. वडगाव रोड, सेलु, जि. वर्धा 4) विशाल रमेश बादलमवार, वय 32 वर्षे, रा. सिंदी (मेघे) वर्धा यांची पंचासमक्ष तपासणी केली असता सदर आरोपीतांच्या ताब्यातुन एका प्लॉस्टीक जिप पॅकेटमध्ये फिक्कट पिवळसर रंगाधी एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ पावडर वजन ३ ग्रॅम 780 मिलीग्रॅम, आरोपी यांचे 4 मोबाईल व एक मारूती सुझुकी कंपनिची एस कॉस कार असा एकुण जु.कि. 7,20.120/- रु. चा माल जप्त करण्यात आला. सदरचा एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ आरोपी क्र. 05) शुभम नावाचा ईसम रा. नागपुर (पसार), यांचे कडून आनल्याचे सांगीतले वरुन सदर आरोपीतांविरुध्द कलम 8 (क), 22(4). 29 एन.डी.पि.एस अॅक्ट 1985 अन्वये पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पसार आरोपी शुभम रा. नागपुर याचा स्था.गु. शा. वर्धा शोध घेत आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, अनुराग जैन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, सागरकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक, विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, सलाम फ्रेशी, सफी. संतोष दरगुडे, हमिद शेख, नरेंद्र पाराशर, श्रिकांत खडसे, राजेश तिवस्कर, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पवन पन्नासे नितीन इंटकरे सागर भोसले, संघसेने कांबळे, मिथुन जिचकार मुकेश ढोके, हर्षल सोनटक्के सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.