ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात चोरट्यांनी दोन लाख तीस हजाराचा ऐवज लांबविला

कुचना येथे घरफोडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तालुक्यातील कुचना येथील एका घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत अलमारीतील पाच हजाराच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लांबीला. सदर घटना दिनांक 25 रोज शुक्रवार ला सकाळी सात वाजता उघडकीस आली. सदर घटनेची तक्रार माजरी पोलिसात करण्यात आली असून माजरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुचना येथील माया पारखी ह्या मुली व नातवंडासह घराच्या हॉलमध्ये झोपल्या असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रोला घरात प्रवेश करून कपाटातील पाच हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने लांबविले. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञ पथकाची मदत घेण्यात आली. मात्र चोट्यांचा शोध लागला नाही. घटनेचा पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये