ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली स्कूल च्या 4 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धे करिता निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

68 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा बरेली (उत्तर प्रदेश) येथे होणार असून होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल च्या 4 विद्यार्थ्यांची निवड व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता झालेली आहे.

17 वर्ष वयाखालील तीन विद्यार्थी सार्थक खोके,यश गुलबे,शौर्य पाटील व 14 वर्षाखालील एक विद्यार्थी ऐश्वर्या निरंजने यांची निवड CBSEWSO संघाकडून करण्यात आली ही स्पर्धा 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान होणार असून 4 नोव्हेंबरला रवाना होणार आहे सिस्टर दीपा हे शाळेचे प्राचार्या असून यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याच दरम्यान विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत स्पर्धेकरिता निवड झाल्याचे सर्व श्रेय शाळेच्या प्राचार्य सिस्टर दीपा उपप्राचार्य सिस्टर ब्लेसी मारिया शाळेच्या लोकल मॅनेजर सिस्टर नवीन बास्टिन क्रीडा शिक्षक प्रीतम चौधरी सर व व जुई शेख मॅडम व तसेच पालकांना देण्यात आले व शाळेच्या प्राचार्यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये