ताज्या घडामोडी

राष्ट्र सेविका समितीचा श्री विजयादशमी उत्सव जल्लोषात साजरा

सशक्त मातृशक्ती निर्मितीसाठी एकवटल्या महिला

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

स्त्री शक्तीला तेजोमय करण्याच्या तसेच देशभक्त स्त्रियांचे संघटन व्हावे, राष्ट्रप्रेम घराघरात रुजावे ह्या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या राजुरा शाखेचा श्री विजयादशमी उत्सव शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संघ कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला.

उत्सवाच्या प्रमुख अतिथी विश्व हिंदू परिषद मातृशक्ती जिल्हा संयोजिका चंद्रपूर सीमा देशमुख, राष्टसेविका समितीच्या जिल्हा बौद्धिक प्रमुख स्नेहा मिसार, विभाग कार्यवाहिका अंजली हिरूळकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज प्रणाम तसेच शस्त्र पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या विश्व हिंदू परिषद मातृशक्ती जिल्हा संयोजिका चंद्रपूर सीमा देशमुख यांनी हिंदुत्व ही जीवन जगण्याची शैली असुन राष्ट्राच्या जडणघडणीत तसेच भावी पिढीच्या संगोपनात हिंदु विचारधारा, संस्कार कसे महत्वाचे आहेत ह्यासह लव्ह जिहाद सारख्या समाज, कुटुंब तसेच धर्म विरोधी आक्रमणाबाबत प्रबोधन केले.

राष्ट्र सेविका समितीच्या जिल्हा बैद्धीक प्रमुख स्नेहा मिसार यांनी वंदेमातरम् ह्या एका शब्दाची शक्ती, ह्याभोवती गुंफलेली देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ व ह्या शब्दाच्या केवळ उच्चाराने नव्हे तर श्रवणाने देखिल सळसळून उठणारे देशभक्तांचे रक्त व त्याने घडवून आणलेला परिणाम ह्याबाबत उद्बोधन व राष्ट्र सेविका समितीच्या कार्याबाबत प्रबोधन केले.

विभाग कार्यवाहिका अंजली हिरूळकर यांनी अखंड भारत निर्मितीचे देशभक्त नागरिकांचे स्वप्न, ह्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला देणे असलेले योगदान ह्यासंदर्भात उपस्थित महिला शक्तीला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता अपराजित यांनी केले. उत्सवाच्या निमित्त प्रतीक्षा गौउकर यांनी समीति नियोग केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्वेता अपराजित, प्रिया रानिंगा, साक्षी भाके ह्यांनी विशेष योगदान दिले. वंदेमातरम् गायनाने संपन्न झालेल्या उत्सवाला प्रतिभा भावे, सगुणा अवधुत, माणिक देशपांडे,  नम्रता खनगण राधिका धनपावडे, शोभा पिपरवार, प्रियंका पिपरवार, माया उपगन्लावार, स्नेहा साईनवार, प्रिती समर्थ, वैशाली कार्लेकर, नंदिनी समर्थ, सुनीता देशकर, निता देशमुख, नम्रता खोंड इत्यादी राष्ट्र सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये