गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. वर्धा (शहर) हददीतील मोपेड गाडी चोरी करणारे चोरटे गजाआड

गुन्हे शोध पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे. वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे आशिष देवचंद मोहोड वय 30 वर्ष धंदा-प्लॉट खरेदी विकी रा. कारला रोड, वैष्णवी कॉम्प्लेक्स, वर्धा मो.क. 8600977785 यांनी दि. 07.10.2024 रोजी तकार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मोपेड गाडी क. एम एच 32 ए यु 1107 ने दुपारी 01.00 वा. सुमारास बडे चौक वर्धा येथे पान खान्याकरीता आले तेव्हा त्यांचे गाडीचे डिक्कीमध्ये आदल्या दिवशी त्यांनी ठेवलेले 45,000/-रु नगदी होते. व त्यांनी गाडीला चाबी लावुनच ठेवुन ते पहाडे यांचे पानठेल्यावर पान खाण्यासाठी गेले पान खाऊन गाडी ठेवलेल्या ठिकाणी परत आले असता त्यांना त्यांची गाडी त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही.

गाडीचा आजुबाजुला शोध घेतला मिळुन आली नाही. ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो. स्टे. वर्धा शहर येथे दि.07.10.2024 रोजी अप क्र. 1610/24 कलम 303 भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच फिर्यादी नामे नितीन प्रल्हादराव पडोळे वय 50 वर्ष रा. एस.टी. डेपो रोड शंकर किराणा समोर, रामनगर, वर्धा यांनी दि. 14/10/2024 रोजी तकार दिली कि, ते त्यांचे पांढऱ्या रंगाचे बर्गमॅन कंपनिचे मोपेड गाडी क. एम एच 32 ए एन 5547 ने दि. 02/10/2024 रोजी दुपारी 03.00 वा. सुमारास सोशालिस्ट चौक येथील राधा मेडीकल स्टोअर्स मध्ये औषध घेण्याकरीता त्यांचे मोपेड गाडीने गेले व औषध घेवुन परत आले तेव्हा त्यांची मोपेड गाडी त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरच्याने चोरुन नेली आहे असे फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप.क. 1642/24 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

तसेच फिर्यादी नामे रितेश गिरीश मांडविया वय 37 वर्ष रा. झेंडा चौक, वर्धा यांनी दि. 02/10/2024 रोजी तकार दिली की, ते त्यांचे वडीलांचे नावाने असलेली मोपेड गाडी त्यांचे ट्रेडर्स दुकानासमोर दि. 27/09/2024 रोजी दुपारी 01.30 वा. ते 02.00 वा. सुमारास गाडीला चाबी लावुन दुकानाचे आत हिशोब करणयाकरीता गेले व हिशोब करुन परत आले तेव्हा त्यांना त्यांचे मोपेड गाडी दिसली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे असे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अप.क 1586/24 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

तसचे फिर्यादी नामे निक्की तिरथ लुडेल वय 33 वर्ष रा. पुलफैल, वर्धा हे दि. 19/10/2024 रोजी सायंकाळी 07.00 वा. सुमारास वार्डातील ढेकले बुध्द विहार चौकात गुपचुप खाण्याकरीता त्यांचे पत्नीचे नावाने असलेल्या पांढऱ्या रंगाचे सुझुकी कंपनिचे अॅसेस मोपेड गाडी क. एम एच 32 ए पी 8013 ने गेले व गाडीला चाबी लावुनच ठेवुन गुपचुप खावुन गाडी ठेवलेल्या ठिकाणी परत आले. तेव्हा त्यांना त्यांची गाडी दिसली नाही त्यांनी सदर गाडीचा आजुबाजुला शोध घेतला मिळुल आली नाही ती कोणीतरी आज्ञत चोरट्याने चोरुन नेली आहे असे फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप.क. 1677/24 कलम 303 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

वरील पो.स्टे. दाखल अप.क. 1610/24 कलम 303 भा.न्या.सं., अप.क. 1642/24 कलम 303(2) भा.न्या.सं., अप.क 1586/24 कलम 303(2) भा.न्या.सं. मध्ये गुन्हयाचे तपासा दरम्यान माहीती मिळाली की, अप.क. 1610/24 कलम 303 भा.न्या.सं., व अप.क. 1642/24 कलम 303(2) भा.न्या.सं. मधील चोरीस गेलेल्या मोपेड गाड्या व आरोपी नामे ऋषीकेश गणेश मानकर वय 20 वर्ष रा. कांद्री ता. परशिवणी जि. नागपुर याचे ताब्यात मिळुन आल्या आहेत अशी माहीती मिळताच नमुद आरोपीस व मोपेड गाड्या ताब्यात घेवुन पो.स्टे. परत येवुन आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याचा पि.सी.आर. प्राप्त करुन पि.सि.आर. दरम्यान त्याने अप.क 1586/24 कलम 303 (2) भा.न्या.सं. मध्ये चोरीस गेलेली मोपेड गाडी सुध्दा चोरल्याचे कबुल केले व ती दुसऱ्याकडे असल्याचे सांगीतले. वरील नमुद आरोपीचे ताब्यातुन दोन मोपेड गाड्या एकुण किंमत 80,000/- रु चा माल जप्त केला.

तसेच अप.क. 1677/24 कलम 303 (2) भा.न्या.सं. मधील आरोपीचा शोध घेतला असता गुप्त बातमिदारामार्फत माहीती मिळाली वरुन आरोपी नामे नयन राजेश निंबाळकर वय 21 वर्ष रा. आनंदनगर, वर्धा यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक पांढऱ्या रंगाची अॅसेस मोपेड गाडी किंमत 80,000/- रु ची जप्त करण्यात आली.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर साहेब, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रतिक्षा खेतमाळीस मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पराग पोटे पो.स्टे. वर्धा (शहर), यांचे निर्देर्शाप्रमाणे, गुन्हे शोध पथक प्रमुख स.पो.नि. विकास गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, किशोर पाटील सहकारी पोलीस नाईक नरेंन्द्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, योगेश ब्राम्हण पो.स्टे. वर्धा (शहर) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये