ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय मिनिगोल्फ संघ कास्य पदकासह मायदेशी परातला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नुकताच पार पडलेल्या चांग माई थायलंड येथे आशियाई मिनिगोल्फ स्पर्धा 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आलेली होती. या मध्ये बऱ्याच देशांनी सहभाग नोंदविला होता या मध्ये भारतीय संघाला पुरुष व महिला संघाला कास्य पदक प्राप्त झाले. काल हैंद्राबाद येथे विमान प्रवास करून भारतात परतले व रेल्वे द्वारे नागपूर करिता रवाना झाले या दरम्यान भारतीय संघांचे बल्लारशाह रेल्वे स्थानाकावर चंद्रपूर मिनिगोल्फ अससोसिएशन चे सचिव प्रितम चौधरी सर, जिवतीचे विवेक शर्मा, दिगंबर फुलबांदे यांच्या कडून पुष्पहार घालून सर्व खेळाडू चे स्वागत करण्यात आले व जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. अविनाश पुंड व क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके बॉक्सिंग अससोसिएशन चे सचिव डॉ. राकेश तिवारी वूडबॉल चे सचिव वाल्मिक खोब्रागडे यांनीही संघांचे अभिनंदन केले व भारतीय संघांनी असेच देशा साठी पदक जिंकावे या करिता शुभेच्छा दिल्या व आशियाई मिनिगोल्फ अससोसिएशन चे टेकनिकल चेअरमन डॉ राजेश जी शेंडेकर यांनी जाहीर सत्कार केल्या बद्दल आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये