ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथे प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशी उघड्यावर!

जनप्रती निधीचे आश्वासन हवेत विरले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गडचिरोली एस.टी. विभागातील ब्रम्हपुरी आगारातील नागभीड येथे मोठा गाजावाजा करून प्रवाश्यांच्या सेवेसाठी सैदव असणाऱ्या जनतेसाठी निवारा हा गेल्या पाच वर्षांपासून आश्वासनावर नागभीड तालुक्यातील जनता वाट पाहत होती. राजकीय पुढाऱ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने कुठे पाणी मुरते हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. नागभीड तालुक्याचे ठिकाण असून नागपूर -गडचिरोली -मूल -चंद्रपूर मार्गांवरील महत्वाचे ठिकाण आहे. दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात मात्र येथील प्रवाश्याना बस स्थानक नसल्याने उघड्यावर उभे राहून बसेस ची वाट पाहावी लागते त्यातच या ठिकाणी ना पिण्याचे पाणी, ना सोई सुविधा उपलब्ध नाही. नागभीड येथील विश्राम गृहाची जागा बस स्थानाकसाठी दिल्याने नागभीड तालुका विश्राम गृहासाठी पोरका झाला आहे. त्यातच बस स्थानाकाचा प्रश्न अजूनही अंधारात खितप त पडल्याने जनता वाऱ्यावर असून याकडे जनाप्रतिनिधी आणि आगार विभाग याकडे लक्ष देतील काय? अशी जनता  येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवेल असे एका नेत्याने खाजकीत सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये