ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावर लिफ्टिंग स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू विभाग स्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडल्या. या जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्ष मुले वयोगटात अब्दुल्ला शेख व ओंकार बावणे ह्या खेळाडूंनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. विभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत हा खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

१९ वर्षे वयोगटात अतिश मोहितकर आणि भूषण ताजणे या दोन्ही खेळाडूंनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. नागपूर विभागीय स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व हे खेडाळू करणार आहेत.

जिल्हास्तरावर पावर लिफ्टिंग स्पर्धेत अव्वल येऊन विभाग स्तरावर निवड झाल्याने या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव, डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार, शेखर जुमडे, माधव केंद्रे, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, शुभम सोयाम, अमोल आवळे, प्रशिक्षक, समस्त प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये