ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी

45,900 रूपयांचा ऐवज लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रसंत नगर, देऊळगाव राजा येथील रहिवासी सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंदा माधवराव कायंदे बाहेरगावी गेले असता अज्ञात व्यक्तींनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना 13 ऑक्टोंबर रोजी रात्री घडली.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे त्यांचे पत्नी सह चिखली येथे नातेवाइकांचे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमा करीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुम मधील कपाटातील पर्समध्ये ठेवलेले दागिणे व रोख रक्कम व मोबाईल असा एकून 45,900 रूपयांचा मुददेमाल चोरुन नेला, चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये