ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ खांडेभराड यांची राकाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ खांडेभराड व रमेश नरोडे यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच देऊळगाव राजा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब शिंगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी केल्या आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मापारी मामा, गणेश सवडे, प्रकाश अहिरे, गोविंद बोरकर, दिनकर जाधव, बंडूभाऊ झोरे, शंतनु भाग्यवंत, रफिक भाई पठाण, बबनराव कासारे, विशाल पवार, नवनाथ गोमथरे व इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये