ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज पुण्यतिथी यांची साजरी

माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      संत शिरोमणी गुरु रविदास महाराज पुण्यतिथी उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार दि.१० ऑक्टोबरला संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिरात वरोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अहतेशामजी अली यांचे हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून विविध कार्यक्रमाद्वारे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी धर्मेंद्र हवेलीकर,मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मेंढे, सचिव विनोद खंडाळे,कोषाध्यक्ष रवींद्र पवार,सदस्य शंकर सदाफळे ,सरीताताई मेंढे,मंदा शेरकी,रुपाली वाढई, इंदू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमाताई खंडाळे, सचीव किर्तीताई पवार,कोषाध्यक्ष कविताताई मेंढे, यांचे हस्ते अहतेशामजी अली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी अहतेशामजी अली यांनी मंडळाचे कामकाज व पुढील वाटचाली संबंधाने चर्चा केली.त्यांनी यावेळी मंदिराच्या वाढीव बांधकामास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये