ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छञपती श्री. शिवाजी महाराज हायस्कुलच्या खेळाडूची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२४- २५ अमरावती विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा दि. १० आॕक्टोंबर रोजी तालुका क्रीडा संकुल पुसद जि.यवतमाळ येथे विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या.

यामध्ये स्थानिक छञपती श्री. शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगांव राजा या शाळेचा खेळाडू रुषिकेश सखाराम विधाते याने उत्तम कामगिरी करत १४ वर्ष वयोगटात ५७ किलो वजन गटात अमरावती विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. व त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या नेञदिपक यशाबद्दल देऊळगांव राजा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मा.श्री. अरूण मोकळ व गटशिक्षणाधिकारी मा.श्री. दादारावजी मुसदवाले,तसेच शाळेचे प्राचार्य संजय देशमुख उप प्राचार्य अव्हाने, तालुका क्रीडा संयोजक राजेश सपाटे, व श्री.संजय मगर. सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक्तेर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये